अबतक सोच रही थी लिखू या रहने दू वो जझबात ….क्योंकी पता हैं दोस्त को प्यार जताना आसान होता हैं। पर वही जो दोस्त भी हो और माँ भी तो थोडा मुश्कील होता हैं।
अपनों को कहीं बार हम granted लेतें हैं सोचते हैं अपनें ही तो हैं, समज जायेंगे …व्यस्त हो जाते हैं अपनें कामों में …जब एहसास होता हैं तब भावनायें बहने लगती हैं रूकतीं नहीं …

भावनांना भाषेची गरज नसते गं, पण त्या व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज मात्र असते आणि शब्द हे भाषेच्या चौकटीत बांधले जातात. तुला माहित आहे म्हणूनच आजच्या दिवशी तुझ्यासाठी मराठीत लिहित आहे गं !
बाकी सर्व जगासाठी मी व्यक्त होत असते पण तुझ्यासमोर तुझ्याबद्दल कधीच काही बोलत नाही. किती साधी आहेस गं तु पण विचारांनी तितकिच महान !!
तु खुप शिक्षण घेतले नाही पण तुझं नेहमी सर्व काही स्पष्ट असते कुठलाच गोंधळ नसतो मनात म्हणूनच आम्ही तिघेही हवं ते बोलतो आणि तु प्रत्येक वेळी आमच्या समस्या दूर करते. खूप हलके झाल्यासारके वाटते नंतर . तु इतके पटकन निर्णय कसे घेत असते गं ? आणि त्यावर ठाम ही राहते. हे माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहे.
घरी आल्यावर सर्वांत पहिले डोळे नेहमी तुला शोधत असतात.तु घरात असली कि छान वाटते भलेही मी तुझ्या सोबत बोलतही नसेन तुझ्या सोबत नटके भांडण झाले असेल तरीही…पण कान नेहमी तो एकच आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले असतात -“नको नाटक करू चल जेवायला”…बस तेवढ्याने राग थोडा का होईना पातळ होतो .
जेव्हा तुला बरं वाटत नसते तेव्हा घरात भयाण शांतता पसरते …किती सावरले तरीही आमच्या काळजाचा जणू ठोकाच चुकतो…ही भयाण शांततेची सावली तेव्हाच संपते जेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे तेज पुर्ववत होते. तु घरी नसते तेव्हा खुपच अस्वस्थ होते…
घराला घरपण येणे काय असते हे तेव्हां कळते जेव्हा तू गावावरून परत येते ; आणि मी स्वयंपाक घरात केलेला पसारा पाहून बोलायला सुरुवात करते .
तेव्हां तुझा पारा चढलेला असतो आणि माझ्या हास्याचा बुडबुडा तोंडावर ठेवलेल्या हाताच्या बाहेर येण्यासाठी धडपडत असतो…वाईट वाटते जेव्हा खरोखर तू चिडते आणि बोलते पण सर्वांत वाईट तेव्हा वाटते जेव्हा तू सुहास ची बाजू सावरते आणि माझ्यापेक्षा जास्त सुहासला जीव लावते😁…
आमच्या जगात असलेली Perfection ची नेमकी व्याख्या काय बरं हे अजून मलाच नाही उमगले ….पण तु केलेला स्वयंपाक ,तु माझ्यासाठी घेतलेला ड्रेस ,तु एखाद्या व्यक्तीबद्दल बनवलेले मत ,तु परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय नेहमीच मला Perfect वाटला …
आमच्या जगात सामील होण्याचा नेहमीच प्रयत्न तु करते .आम्ही दोघांनी वापरलेले इंग्रजी शब्द जेव्हा तु बोलतांनी वापरते ना तर खरंच उच्चार ऐकून पोट धरून हसण्याची पाळी येते …किती गं तो innocence!!.. जिथे मी सर्वच संपवायला निघाले होते तिथे तू थांबवले आणि माझी खरया अर्थाने मैत्रीण झालीस.आता तर तू माझ्याच मैत्रिणीं सोबत माझ्या चुगल्या करते …हसत हसत सर्व मिळून माझी उडवतात!!! तुझ्या चेहऱ्यावरचे हसू नेहमीच सर्वांना प्रसन्न करते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ..
एक आई ,मुलगी,बहिण,बायको,आत्या, वहिनी, मामी,आजी या सर्वच नात्यांना नेहमीच साजेसे वागली …सर्वांना संभाळून घेतले …हवं तेव्हा प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलीस…काकू असून रिद्धी सिद्धी ला आईसारखे प्रेम दिले …मला तर भरभरून…म्हणून तुच खरी perfection ची व्याख्या वाटते…
तु आमच्या सर्वांसाठी प्राणवायू आहेस गं…अगदी सर्वच काही..शेवटी हेच म्हणणार- Happy birthday Mammi🎂🎊💐🌱💛
I love you Mammi to the moon and back 😘♥
Your’s daughter only,
-Mai
(Bhagyashri Bhilore)